 
            पिंपळनेर ः ए एम पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक महासंघाचे तालुका सचिव, सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यरत असणारे महेश ज्ञानेश्वर मराठे यांना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात महेश मराठे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस शिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष प्रकाश सोनवणे, आमदार साजिद खान पठाण, पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस डॉ यशराज पारखी, सहसंयोजक डॉ नितीन देऊळकर, संदीप शेवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला साक्री तालुका माध्यमिक सेवकांच्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे एम वाघ, एन एस सांळुके, लालाजी मोरे, डी व्ही सूर्यवंशी, दीपक सोनवणे, प्रकाश शेवाळे, सुनील देवरे, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक डी पी कुंवर, पी आर खैरनार, ए आर सूर्यवंशी, जे डी मराठे, कैलास निकम आदींची उपस्थिती होती.
महेश मराठे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील, रेखा पाटील, स्वप्नील बोढे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे व संचालक कुणाल गांगुर्डे, संचालक यजुर्वेंद्र मराठे, संचालक जयेश मराठे, प्राचार्या एस एस पवार, बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ सतीश पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, साक्री तालुका क्रीडा शिक्षक महासंघ, युवा क्रीडा शिक्षक महासंघ, संयोजक समिती व सर्व क्रीडा शिक्षक बांधव, सामाजिक, राजकीय व क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



