जय हिंद विद्यालय खेळाडूंची शालेय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी

  • By admin
  • October 16, 2025
  • 0
  • 51 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालय येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत जयहिंद विद्यालय, बाभूळगाव येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

१७ वर्षांखालील गटात मुला-मुलींनी उल्लेखनीय यश मिळवले. या गटात योगेश गोरावणे यांनी ८०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. धनश्री गुजराणे हिने उंच उडीमध्ये प्रथम तसेच ४०० मीटर हर्डल्स आणि गोळाफेक या दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला. श्रद्धा दरेकर हिने १५०० मीटर धावण्यात द्वितीय तर अक्षरा वाघ हिने ३००० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. रेणुका दरेकर भालाफेक मध्ये द्वितीय ठरली. गायत्री जाधव हिने ३ किलोमीटर चालण्यात प्रथम आणि ८०० मीटर धावण्यात द्वितीय स्थान मिळवले. श्रावणी तुपे हिने ३ किलोमीटर चालण्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

या सर्व खेळाडूंनी संघात्मक स्पर्धेतही दमदार प्रदर्शन केले. अक्षरा वाघ, रेणुका दरेकर, श्रद्धा दरेकर, सिद्धी साळुंके, धनश्री गुजराणे, गायत्री जाधव, श्रावणी तुपे आणि आदिती पिंगट यांच्या ४×१०० मीटर रिले संघाने तृतीय तर ४×४०० मी. रिले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात अमृता तुपे हिने १५०० मीटर धावण्यात द्वितीय आणि क्रॉस कंट्री प्रथम स्थान पटकावले. शारदा राऊत हिने १५०० मीटर धावण्यात द्वितीय तसेच क्रॉस कंट्री तृतीय क्रमांक मिळवला. आकांक्षा नरोडे हिने ३००० मीटर धावण्यात प्रथम आणि क्रॉस कंट्री द्वितीय स्थान पटकावले, तर दिपाली आगवणे हिने क्रॉसकंट्री चौथा क्रमांक मिळवला.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात गायत्री तुपे हिने गोळाफेक आणि ८० मीटर हर्डल्स दोन्ही प्रकारांत तृतीय स्थान पटकावले. फिजा शेख, समृद्धी तुपे, वेदिका सोनवणे आणि गायत्री तुपे यांच्या ४×१०० मीटर रिले संघानेही तृतीय स्थान मिळवले.

या सर्व यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा जी २९ व ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे, त्यासाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष कल्याणराव पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व गावकऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *