जागतिक भूलतज्ज्ञ दिनानिमित्त सायकल राईड आणि वॉकेथॉनचे आयोजन

  • By admin
  • October 16, 2025
  • 0
  • 88 Views
Spread the love

सायकलिस्ट फाऊंडेशन व एमजीएम हॉस्पिटल भूलतज्ज्ञ विभागाचा संयुक्त उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : जागतिक भूलतज्ज्ञ दिनानिमित्ताने सायकलिस्ट फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने असोसिएशन ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट, एमजीएम हॉस्पिटल भूलतज्ज्ञ विभागतर्फे सायकल राईड आणि वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल ७५ सहभागी उत्साहाने सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात एमजीएम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आर राघवन, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ प्रमोद भाले, अध्यक्षा डॉ. संहिता कुलकर्णी आणि सचिव डॉ. सचिन नाचणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. या राईडचा मार्ग एमजीएम हॉस्पिटल- सेवन हिल्स-क्रांती चौक-परत एमजीएम स्पोर्ट्स कॅन्टीन असा होता.

या प्रसंगी डॉ संहिता कुलकर्णी यांनी जागतिक भूलदिनाचे औचित्य सांगून समाजात भूलतज्ज्ञांविषयी असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकला. तसेच राईडनंतर सहभागींना डॉ वासंती केळकर, डॉ प्रमोद भाले, डॉ खाडे, डॉ खोडवे, डॉ सचिन नाचणे, डॉ तांदळे, डॉ दळवी आणि डॉ विजय व्यवहारे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी डॉ स्वाती पांडे, डॉ अमोल पांडव, डॉ ज्येष्ठराज पतंगेकर, डॉ प्रीती सरोदे, डॉ विजय व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या सायकल राईडमध्ये डॉ अरुण गावंडे, डॉ प्रशांत महाले, जयंत सांगवीकर, प्रसाद कोळेकर, मनीष जोशी, सचिन जोशी, अ‍ॅड शुभांगी मोरे, प्रणिता बर्दापूरकर, लक्ष्मण साळुंके, शिवाजी राजे, मनोज वडगावकर, भगवान मगर, मल्लिकार्जुन स्वामी, नारायण चकोर, सचिन गोडसे, प्रमोद सुर्वे, अनिल टाकळीकर, हेमंत भावसार, अ‍ॅड नितीन साळवे, विजय पाटोदी, अनिल सुलाखे, डॉ वैभव कापरे, सतीश अन्वेकर, संतोष हिरेमठ, शुभम सरसांडे, अनिल सुरडकर, सर्फराज पठाण, शरद राजे, प्रवीण शेजुल, विश्रांती गायकवाड आदी सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमातून आरोग्य, पर्यावरण व समाजजागृतीचा सुंदर संगम साधला गेला. आयोजक व सहभागी सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *