 
            मुंबई : प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती चषक महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी सादर करत एकूण १२ सुवर्ण, २२ रौप्य आणि २४ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या या दमदार प्रदर्शनाने राज्यभरात ठाण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत ठाण्याचे खेळाडू पार्थ टोलार, रुद्र देसाई, विवान दुबे, कार्तिक ठाकूर, स्वरूप वायाळ, वेदराज काकडे, शिवम यादव, शिवांश सिंग, आदित्य खरात, विहान तरे, अर्णव भाट, अक्षय चव्हाण, सुयश परुळेकर, शान पाटील, वंशिका सोनवणे, भुवी रावत, जिज्ञासा नर, हर्षिता गुरव, वंशिका रोडगे, काव्या जोशी, पूर्वा आंब्रे, यशिका हरवते, अनुष्का खरात, ॲलिस अल्फोन्स, स्वरा चव्हाण, आनंदी चव्हाण, अंकिता चव्हाण, वैष्णवी ठाकूर, विहान पाटील, तन्मय पालकर, श्रीराज शिंदे, पूर्वा पालकर व रुधा पाटील यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून जिल्ह्याला मानाचा मुकुट मिळवून दिला. तसेच भुवी रावत, वंशिका रोडगे आणि जिज्ञासा नर या तिघींनी ग्रुप काता प्रकारात रौप्यपदक जिंकत ठाण्याच्या यशात आणखी एक मानाचा तुरा जोडला.
या सर्व विजेत्या खेळाडूंना आर जे ठाकूर कराटे क्लबचे मुख्य प्रशिक्षक सतीश पाटील, पंच श्रेयश पाटील, प्रशिक्षक सागर शिंदे, मयुरी कदम, सिद्धी निकम आणि युविका हेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, ठाण्याच्या कराटे क्षेत्रात नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.



