रॉयल फिटनेस क्लबच्या संतोषीला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

  • By admin
  • October 17, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

धुळे ः ओडिशा (भुवनेश्वर) येथे झालेल्या ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या ४०व्या राष्ट्रीय स्पर्धेत स्पर्धेत १६ वर्ष वयोगटात मुलींमध्ये धुळ्याच्या संतोषी पिंपळासे हिने चमकदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले. 

धुळे जिल्हा ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र व धुळे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि रॉयल फिटनेस क्लब येथे प्रशिक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी खेळाडू संतोषी पिंपळासे हिने मिडले रिले मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच ६०० मीटर धावणे या प्रकारात महाराष्ट्र विक्रम स्थापित केला व ५ पोजिशनला फिनिश केले (नोंदविलेली वेळ १.३४).

संतोषी ही कमलाबाई अजमेरा हायस्कूल येथे १० वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष व तिचे क्रीडा शिक्षक हेमंत भदाणे, क्रीडा अधिकारी एम के पाटील, विश्वास पाटील, सुखदेव महाले व धनंजय सोनवणे, अनिल मराठे  महेश भवरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *