
छत्रपती संभाजीनगर ः विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची परंपरा कायम राखली. तृप्ती भवर हिने ७२ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून स्पर्धा गाजवली.
दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा, जिल्हा अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षीही तृप्ती नारायण भवर हिने १९ वर्षांखालील ७२ किलो गटामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व केले. तिने तिच्या गटातील सर्व कुस्त्यांमध्ये विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मिक सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, कोषाध्यक्ष विशाल सुरासे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, कुस्ती पंच व कोच शरद कचरे, रेखा परदेशी, तालुका क्रीडा अधिकारी मुकुल वाडकर, तालुका क्रीडा मार्गदर्शक डॉ सोमनाथ टाक, लक्ष्मण सपकाळ, नारायण भवर, नरहरी तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश गायकवाड, स्वप्नील गव्हाणे, बालाजी नलभे, नंदकिशोर पातकळ, स्वप्नजा पाटील, विजय सपकाळ, सोन्याबापू पालवे, नारायण औटे, भाऊसाहेब गायकवाड, अमोल गायकवाड, प्रकाश कामडी, अनिता तारख, आकेश दांडेकर, प्रवीण काळे, शितल धायगुडे, अस्मिता भिसे, अक्षय शेळके, ओकार औटे, निखिल पापुलवार, विठ्ठल त्रिभुवन, सतीश पवार, महेश गायकवाड आदींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.