
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संस्कृती ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
१४ वर्षांखालील वयोगटात ४१ किलो वजन गटात पार्थ दौड याने प्रथम क्रमांक पटकावले. तसेच १७ वर्षांखालील वयोगटात ९२ किलो वजन गटात संदीपसिंग ढिलोन याने प्रथम क्रमांक मिळवला. या प्रभावी कामगिरीनंतर त्याच ठिकाणी आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत संदीपसिंग ढिलोन याने १७ वर्षांखालील ९२ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावत पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवली.
या उत्कृष्ट यशाबद्दल शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्कृती ग्लोबल स्कूलचे प्राचार्य प्रा बाबासाहेब मोराळकर, सचिव गीता मोराळकर, क्रीडा शिक्षक राहुल सरोदे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी पार्थ दौड व संदीपसिंग ढिलोन यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.शाळेच्या व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि खेळातील निष्ठेचे कौतुक करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.