
परभणी ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल असोसिएशनतर्फे वरिष्ठ गट महिला व पुरुष राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन विभागीय जिल्हा क्रीडा संकुल येथे २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा नेटबॉल महिला व पुरुष संघ सहभागी होणार असून या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल परभणी या ठिकाणी करण्यात आले आहे.
या निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी सोबत आधारकार्ड झेरॉक्स, बोनाफाईड, दहावीची सनद झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन उपस्थित रहावे. या निवड चाचणीसाठी निवड समिती सदस्य म्हणून मनीष जाधव, सिंधू शेळके, प्रणव यादव हे काम पाहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव कैलास माने, प्रा विनोद गणाचार्य, प्रा संतोष कोकीळ, राष्ट्रीय प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, प्रा राजासाहेब रेंगे, नंदकिशोर कुंडगीर, प्रकाश पंडित, मानव माने यांनी केले आहे.