डॉ जितेंद्र लिंबकर यांचा व्हिएतनाम येथे सन्मान

  • By admin
  • October 19, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

‘योगाद्वारे शैक्षणिक प्रगती’ या विषयावर सादर केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद

मुंबई ः चेंबूर नाका एमपीएस शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ जितेंद्र लिंबकर यांना व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उल्लेखनीय सन्मान मिळाला.

जीएलसी योग स्कूल आयोजित “Global Peace Through a Holistic Lens – Integrating Yoga, Physical Education and Traditional Sports” या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी “Role of Yoga in Enhancing Academic Achievement Among Students” या विषयावर आपला संशोधनपर पेपर सादर केला.

या चर्चासत्रासाठी त्यांना FPT University, Danang, Vietnam आणि BPCA College, Mumbai, India यांच्या संयुक्त विद्यमाने आमंत्रित करण्यात आले होते. योग, शिक्षण आणि पारंपरिक क्रीडा यांच्या समन्वयातून जागतिक शांततेचा संदेश देणारे हे चर्चासत्र अत्यंत प्रभावी आणि ज्ञानसमृद्ध ठरले.

मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
या प्रसंगी जीएलसी योग स्कूलच्या संस्थापक एम ए हो थी थान मिन्ह, डॉ शिवम मिश्रा (उपाध्यक्ष, जीएलसी स्कूल) तसेच योग सेवक शिशपालन (अध्यक्ष, गुजरात स्टेट योग बोर्ड) यांच्या हस्ते डॉ. जितेंद्र लिंबकर यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भारतीय प्रतिनिधींची उल्लेखनीय कामगिरी
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथील प्राध्यापक डॉ जयसिंग होटकर, डॉ कैलास असाई, डॉ राजेंद्र शेळके आणि डॉ विशाल साळवे यांनी देखील आपले संशोधनपर पेपर सादर केले. त्यांनाही सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा ठसा
१३ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान व्हिएतनाम येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भारतातील योग व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपली शैक्षणिक आणि संशोधन क्षमता प्रभावीपणे सादर केली. डॉ जितेंद्र लिंबकर यांच्या या यशाबद्दल शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *