
हिंगोली ः परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हँडबॉल स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत सेनगाव येथील एआरटीएम इंग्लिश स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत एआरटीएम स्कूल संघाने बीड संघास ११-३ गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
या चमकदार कामगिरीमुळे एआरटीएम स्कूलचा संघ हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात कर्णधार योगेश दळवी, उपकर्णधार कौशल व्यास, ऋग्वेद खनपटे, स्वराज शिंदे, प्रथमेश पजई, अनुज पजई, मयुर चव्हाण यांचा समावेश होता.
या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्य रोलर हँडबॉल संघटना अध्यक्ष संतोष कंठाळे, सचिव तुकाराम ठोंबरे, गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, एआरटीएम इंग्लिश स्कूल सेनगावचे संचालक पंकज तोष्णीवाल, प्राचार्य प्रवीण कापसे, डॉ. हेमंत शिंदे. प्रा. शंकर पजई, विकास दळवी, संतोष चव्हाण, गजानन व्यास, थिटे, रहीम कुरेशी, सोपान नाईक, पवन राठोड, रावसाहेब गेंडाफले यांनी शुभेच्छा दिल्या. या संघास संतोष शिंदे आण अमोल घुगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.