
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकॅडमीचा प्रतिभावान विद्यार्थी प्रथम वारंग याने अलीकडेच झालेल्या १४ वर्षांखालील लहान गट आणि खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या स्पर्धेत प्रथमने अप्रतिम संयम, अचूक विचारशक्ती आणि योजनाबद्ध खेळ सादर करत ६ पैकी ८ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले. त्याच्या डावपेचपूर्ण खेळामुळे आणि स्थिर लक्ष केंद्रीत ठेवण्याच्या क्षमतेमुळे तो आपल्या गटातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला गेला.
अकॅडमीचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाने प्रथमच्या या यशाचा गौरव करत सांगितले की, प्रथम हा अत्यंत समर्पित आणि बुद्धिमान खेळाडू आहे. त्याच्यात राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता आहे.”या कामगिरीमुळे व्हिक्टोरियस चेस अकॅडमीचा गौरव वाढला असून, सर्वांनी प्रथमला आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.