
जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा
जळगाव : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनतर्फे येत्या २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी चिंचवड (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनियर डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जामनेर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून खेळाडूंची निवड करण्यात आली. संघ जाहीर करताना जळगाव जिल्हा अमॅच्युअर डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाला भाजप जामनेर शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे, पारधी महासंघाचे अध्यक्ष गोकुळ साळुंखे, कार्याध्यक्ष गिरीश पाटील, तसेच अनंतराव जाधव, प्रवीण दौलत पाटील, दीपक चौधरी, भगवान बेनाडे, गजानन कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संघ निवड समितीमध्ये गिरीश पाटील, डॉ कांचन विसपुते, नितीन पाटील व सुष्मिता पाटील यांनी काम पाहिले. मार्गदर्शन जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले.
राज्य स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ नारायण खडके, किशोर चौधरी, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, तसेच प्रा आशिष चौधरी, चंद्रशेखर पाटील, प्रशांत कोल्हे, राहुल साळुंखे, सचिन सूर्यवंशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले जळगाव जिल्हा संघ
मुलांचा संघ ः तेजस राऊत, ईशांत शिंदे, सुमित तायडे, तन्मय पाटील, सार्थक पाटील, चैतन्य बुंधेले, सुजित पाटील, नरेंद्र मराठे, कुणाल शेळके, आदित्य मोरे, दीपेश वैरागड, भावेश माळी. संघ व्यवस्थापक : गिरीश पाटील, प्रशिक्षक : विनायक सपकाळे.
मुलींचा संघ ः सृष्टी जाधव, सृष्टी वाघ, मिताली चिमणकर, दीक्षिता पाटील, तनिष्का पाटील, तेजस्विनी पाटील, अनुष्का चौधरी, श्रुती बोरसे, अक्षरा पाटील, हर्षदा जाधव, हर्षाली मिस्त्री, कोमल चिंचोले. संघ व्यवस्थापक : श्रद्धा शिंदे आणि प्रशिक्षक : मिताली मिस्त्री.या संघाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा राज्यस्तरावर दमदार कामगिरी करेल, असा विश्वास जळगाव जिल्हा अमॅच्युअर डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी व्यक्त केला.