महाराष्ट्राचा संघ साऊथ आफ्रिका दौऱ्यात सहा टी २० खेळणार  

  • By admin
  • October 23, 2025
  • 0
  • 123 Views
Spread the love

संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचा उपक्रम

कल्याण ः कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीतर्फे महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ सलग १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आणि उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी साऊथ आफ्रिका (जोहान्सबर्ग) येथे रवाना झाला आहे. हा दौरा २२ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून, या संघातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रिकेट कौशल्य सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

या दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवडलेले १४ प्रतिभावान खेळाडू सहभागी झाले आहेत. संघ दोन डे-नाईट सामने आणि सहा टी-२० सामने खेळणार असून, याशिवाय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.या उच्चस्तरीय प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मौर्कल बंधू तसेच लायन्स टीमचे प्रमुख प्रशिक्षक कर्ट हुमन हे खेळाडूंना तांत्रिक व व्यावहारिक प्रशिक्षण देतील. या स्पर्धेचे आयोजन ईस्टर्न क्रिकेट अकॅडमी (जोहान्सबर्ग) यांनी केले असून, भारतीय तरुण क्रिकेटपटूंना या अनुभवातून मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास प्रमुख आयोजक संतोष पाठक यांनी व्यक्त केला.

या दौऱ्यासाठी संतोष पाठक हे संघप्रमुख म्हणून तर प्रशिक्षक परेश हिंदुराव हे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील या युवा खेळाडूंना आमदार संजय दत्त, ब्रिजकिशोर दत्त आणि महाराष्ट्र क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे यांनी शुभेच्छा दिल्या.

या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचा हा उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी भागातील खेळाडूंना “ग्लोबल प्लॅटफॉर्म” मिळवून देणारा ठरत आहे, असे संतोष क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक संतोष पाठक यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचा अंडर १४ क्रिकेट संघ
रुद्र मेढी, साई पाटील, घनामृत पाटील, कृष्णा धामी, यश भुरभूडा, अंश यादव, मुराडे शार्दुल, सात्विक कारेकर, क्षितिज बिरे, राजवीर कुटे, देवांश सोनवणे, नक्श सिंग, शर्विल दिवटे, वेदिका कुंभार्डे, तसेच प्रशिक्षक परेश हिंदुराव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *