अभिनव बिंद्रा यांचा सन्मान, हिवाळी ऑलिंपिकसाठी मशालवाहक म्हणून निवड

  • By admin
  • October 23, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

नवी दिल्ली ः ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची पुढील वर्षीच्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ६ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान इटलीतील मिलान आणि कोर्टिना डी’अँपेझो येथे आयोजित केली जाणार आहे.

सन्मानाची घोषणा करताना बिंद्रा यांनी त्यांच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये लिहिले की, “मिलानो-कॉर्टिना २०२६ ऑलिंपिक मशाल रिलेसाठी मशालवाहक म्हणून निवड झाल्याने मी खरोखरच नम्र आहे. ऑलिंपिक मशाल नेहमीच माझ्या हृदयात एक विशेष स्थान राखत आहे. ती स्वप्ने, चिकाटी आणि खेळ आपल्या जगात आणणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे.”

२००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा बिंद्रा पुढे म्हणाला, “पुन्हा एकदा ही संधी मिळणे हा एक सन्मान आहे आणि खेळांमुळे काय शक्य होते याची एक सुंदर आठवण आहे. या अविश्वसनीय सन्मानाबद्दल ‘मिलान कॉर्टिना२०२६’ चे आभार.” हे इटलीचे चौथे हिवाळी ऑलिंपिक असेल. १६ खेळांमध्ये एकूण ११६ पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला जाईल, जो २०२२ च्या बीजिंगपेक्षा सात जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *