नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पेठे विद्यालय, नाशिक येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
कुस्ती स्पर्धामध्ये जयश्री शिवरे व दर्शना निखडे, धनुर्विद्या स्पर्धामध्ये रोशन गावित व जयराम थविल, तर जिम्नॅस्टिक स्पर्धामध्ये यश झनकर या खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अमोल जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पेठे विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष नंदा पेटकर, शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, सुपरवायझर भागवत सूर्यवंशी, संस्थेचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे, तसेच पालक-शिक्षक संघ आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या यशामुळे पेठे विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक अभिमानाची नोंद झाली आहे.



