जळगाव ः रत्नागिरी येथे २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनची खेळाडू देवयानी भिला पाटील हिने मुलींच्या ४४ किलोखालील वजन गटात कांस्यपदक पटकावले आहे.
नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुद्धा तिने कांस्यपदक पदक पटकाविले होते. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे याचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.




Vollyball