सीएम चषक बास्केटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर टीम अव्वल स्थानी

  • By admin
  • October 28, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

महिला संघाची दमदार कामगिरी 

नागपूर : धरमपेठ क्रीडा मंडळ, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७५ व्या सीएम चषक महाराष्ट्र बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या पुरुष व महिला संघांनी दमदार कामगिरीची छाप उमटविली आहे.

या स्पर्धेच्या साखळी फेरीत छत्रपती संभाजीनगर पुरुष संघाने विजयाची परंपरा कायम ठेवत अव्वलस्थान पटकावले.या सामन्यात छत्रपती संभाजीनगरने वाशीम संघाचा ६५-४८ असा १७ गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू विपूल कड, कर्णधार शुभम लाटे, अभिषेक अंभोरे, शुभम गवळी, रोहित परदेशी व अर्णव देशमुख यांनी अफलातून खेळाची झलक दाखवत संघाला बादफेरीतील उप-उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले.

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पुरुष संघाने जळगाव संघाचा ७०-२५ तर रायगड संघाचा ५६-२२ अशा एकतर्फी सामन्यांत धुव्वा उडवत साखळी फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.महिला संघाची दमदार कामगिरीमहिला गटातील सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने लातूरचा २७-१२ असा सहज पराभव करीत आपला विजयी क्रम कायम ठेवला.

या विजयात संजना जगताप, केतकी ढंगारे, मानसी शिंदे, आकृती बाहेती यांची खेळी विशेष ठरली.छत्रपती संभाजीनगरच्या दोन्ही संघांनी दाखविलेल्या आकर्षक व सांघिक खेळामुळे प्रदेशातील बास्केटबॉल क्रीडेचे नवे शिखर गाठण्याची आशा निर्माण झाली असून आगामी बाद फेरीतही संघ तेज राखेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

छत्रपती संभाजीनगर संघ

पुरुष संघ ः विपूल कड, अभिषेक अंभोरे, शुभम गवळी, शुभम लाटे, अर्णव देशमुख, राजेश्वर परदेशी, नरेंद्र चौधरी, प्रदीप लाटे, अजय सोनवणे, सौरभ दीपके, ऋषीकेश ढंगारे. मुख्य प्रशिक्षक : गणेश कड, सहाय्यक प्रशिक्षक : प्रशांत बुरांडे

महिला संघ ः संजना जगताप, केतकी ढंगारे, मानसी शिंदे, आकृती बाहेती, भूमी कपूर, विशाखा बाहेती, निशा इरमुळे, गार्गी पाटील, सुरमई भागवत, कशिष खिल्लारे, ईश्वरी बुरांडे. मुख्य प्रशिक्षक : मनजीत दारोगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *