चंदीगड संघाला १४४ धावांनी नमवले
चंदीगड ः महाराष्ट्र क्रिकेट संघाने चंदीगड संघाचा १४४ धावांनी पराभव करुन रणजी ट्रॉफी हंगामातील पहिला विजय नोंदवला. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, विकी ओस्तवाल, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष यांची कामगिरी सरस ठरली.

रणजी हंगामाची सनसनाटी सुरुवात करणाऱया महाराष्ट्र संघाने दुसरा सामना गाजवला. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवत चंदीगड संघाची कडवी झुंज मोडून काढत १४४ धावांनी शानदार विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र ः पहिला डाव – ८५.५ षटकात सर्वबाद ३१३ (ऋतुराज गायकवाड ११६, अर्शीन कुलकर्णी ५०, सौरभ नवले ६६, रामकृष्ण घोष ३१, जगजीत सिंग ३-७९, अभिषेक सैनी ३-५५, विशु कश्यप २-४४, रमण बिश्नोई २-१४).
चंदीगड ः पहिला डाव – ७३ षटकात सर्वबाद २०९ (शिवम भांबरी ३३, अर्जुन आझाद २९, रमण बिश्नोई ५४, निशुंक बिर्ला नाबाद ५६, विकी ओस्तवाल ६-४०, रामकृष्ण घोष २-५१).
महाराष्ट्र ः दुसरा डाव – ५२ षटकात तीन बाद ३५९ डाव घोषित (पृथ्वी शॉ २२२, अर्शीन कुलकर्णी ३१, सिद्धेश वीर ६२, ऋतुराज गायकवाड नाबाद ३६, अंकित बावणे नाबाद १, जगजीत सिंग १-५६, विशु कश्यप १-८०, अर्जुन आझाद १५).
चंदीगड ः दुसरा डाव – ९४.१ षटकात सर्वबाद ३१९ (अर्जुन आझाद १६८, मनन वोहरा ५८, राज बावा ४२, मुकेश चौधरी ४-३४, रामकृष्ण घोष ४-७१, प्रदीप दाढे १-५२, जलज सक्सेना १-५०).



