रत्नागिरी ः रत्नागिरीची तायक्वांदो खेळाडू मृदुला योगेश पाटील हिने राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले. या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मृदुलाचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण – चिपळूण येथे ३५ वी राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत एस आर के तायक्वांदो क्लब, रत्नागिरीची खेळाडू मृदुला पाटील हिने १७ वर्षांखालील ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्र संघात निवड निश्चित केली.
आता मृदुला ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान कोरमंगलम इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू (कर्नाटक) येथे होणाऱ्या ४२ व्या राष्ट्रीय तायक्वांदो ज्युनियर क्युरुगी चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. मृदुलाला राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या यशाबद्दल विविध मान्यवरांनी मृदुलाला शुभेच्छा दिल्या. त्यात मा. उदयजी सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख बिपिन बंदरकर, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना देसाई, युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक पवार, विभाग प्रमुख प्रथमेश साळवी, युवा सेना शहर सचिव, तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आदींचा समावेश आहे.



