तुळजापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव आणि धाराशिव जिल्हा सॉफ्टबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लातूर विभागीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धांचा भव्य समारोप तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात झाला.
या स्पर्धांचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व धाराशिव जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अनिल धोत्रे, विष्णू दळवी, राजेश बिलकुले यांची उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यात जिल्हा संघटनेचे उल्लेखनीय योगदान राहिले.
उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय बिरादार यांचा सत्कार अनिल धोत्रे व राजेश बिलकुले यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्पर्धेत लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील अंडर–१४, अंडर–१७ आणि अंडर–१९ मुला-मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संघांनी उत्कृष्ट कौशल्य, संघभावना आणि स्पर्धात्मक जिद्द दाखवत सामने रंगतदार केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू दळवी, राजेश बिलकुले (स्पर्धा प्रमुख), मुकेश बिराजदार, नरेंद्र स्वामी, नारायण झिपरे, प्रज्वल जाधव, रण विजयसिंह, तसेच मिरज काटंबे, निहाल मुलाणी, शिवराज वारे, श्रीशैल पाटील, व्यंकटेश झिपरे, सरोदे सर, शिंदे सर, विशाल मुकुटराव, सुमित पेंडलवार, श्रीमती बिराजदार, श्रीमती जाधव, तारे, श्रीमती जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अनिल धोत्रे यांनी केले, तर राजेश बिलकुले यांनी आभार मानले.


