बंगळुरू ः भारत अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका अ संघाने त्यांच्या पहिल्या डावात नऊ बाद २९९ धावा केल्या.
भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका अ संघाकडून जॉर्डन हर्नमन, झुबेर हमजा आणि रुबिन हर्नमन यांनी अर्धशतकं झळकावली. जॉर्डनने ७१, हमजा ६६ आणि रुबिनने ५४ धावा केल्या. टियान व्हॅन वुरेन यांनीही ४६ धावांचे योगदान दिले. खेळ थांबला तेव्हा त्शेपो मोरेकी चार धावांसह खेळत होते. भारताकडून टुनस कोटियनने शानदार गोलंदाजी करत चार बळी घेतले, तर मानव सुथारने दोन बळी घेतले. खलील अहमद, अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.



