 
            मुंबई ः ५० वी ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आपल्या संघाची घोषणा केली आहे.
मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग शिवाय प्रथमच कोल्हापूरच्या ३ खेळाडूंची संघात निवड झाली आहे. या संघाचे प्रशिक्षण शिबीर मुंबई येथील, एम सी ए ट्रेनिंग सेंटर येथे संपन्न झाले. या शिबिरात ज्येष्ठ राष्ट्रीय विजेते कॅरमपटू संजय मांडे व आंतर राष्ट्रीय पंच केतन चिखले यांनी संघाला मार्गदर्शन केले. संपूर्ण संघाला किट, प्रशिक्षण शिबिराचा खर्च, प्रवासातील भोजन खर्च व खेळाडूंचा वातानुकूलित प्रवास खर्च महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा ज्युनियर संघ
१८ वर्षाखालील मुले : १) आयुष गरुड (पुणे), २) ओम पारकर (रत्नागिरी), ३) मुनावर सय्यद (मुंबई उपनगर), ४) उमर शेख (मुंबई), ५) ओमकार वडर (कोल्हापूर), ६) महम्मद शेख (कोल्हापूर).
२१ वर्षाखालील मुले (युथ) : १) मिहीर शेख (मुंबई), २) ओजस जाधव (मुंबई), संघ व्यवस्थापक : वासिम खान (पुणे).
१८ वर्षाखालील मुली : १) सोनाली कुमारी (मुंबई), २) मधुरा देवळे (ठाणे), ३) सिमरन शिंदे (मुंबई), ४) ईश्वरी पाटील (कोल्हापूर), ५) तनया पाटील (पुणे), जिया पटेल (पालघर).
२१ वर्षाखालील मुली (युथ) : १) आकांक्षा कदम (रत्नागिरी), २) दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), संघ व्यवस्थापक : मयुरी भामरे (धुळे).



