अमरावती : सिंधी हिंदी हायस्कूल, अमरावतीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बुध्दीबळ व स्क्वॅश स्पर्धेसाठी पात्र ठरत शाळेचा मान उंचावला आहे.
अकोला येथे १६ व १७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विभागस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रसन्न प्रशांत हिरपुरकर याने अंडर १९ गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच, १० व ११ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे पार पडलेल्या विभागस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत शाळेच्या नम्रता विजय तंतरपाळे (अंडर १७) हिने चतुर्थ क्रमांक मिळवत राज्यस्तरासाठी पात्रता मिळवली. वर्षा हरीश पंजवानी (अंडर १९) हिने पाचवा क्रमांक मिळवत प्राविण्य सिद्ध करीत राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. ही स्पर्धा पुणे येथे होणार आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी, नेटबॉल, ज्यूदो, डॉजबॉल, सेपक टकरॉ आदी विविध क्रीडा प्रकारांतही जिल्हा व विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विजेत्या खेळाडूंना सिंधीज वेल्फेअर असोसिएशन चे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सुनिता रघुवंशी, पर्यवेक्षक सुधीर जोशी, क्रीडा शिक्षक गणेश तांबे, शिक्षकवर्ग तसेच माजी विद्यार्थी आयुष बजाज व राजकुमार चैनानी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



