मुंबई : भारतीय सेपक टाक्रो क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा काळोख पसरला आहे. सेपक टकरॉ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष योगेंद्रसिंग दहिया आणि वरिष्ठ खेळाडू अंकित बलिया यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दहिया हे केवळ संघाचे अध्यक्ष नव्हते, तर खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी नेता आणि सतत संघटन व क्रीडा विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. तर अंकित बलिया हे प्रतिभावान खेळाडू असून खेळावरील अपार प्रेम, सहकार्याची वृत्ती आणि सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबाबत ओळखले जात होते.या दोघांच्या अकस्मात निधनाने सेपक टकरॉ कुटुंबाने दोन तेजस्वी तारे गमावले आहेत. त्यांचे योगदान, कार्य आणि प्रेरणा आगामी पिढ्यांना दिशादर्शक ठरेल.



