श्रॉफ शाळेत योगासन स्पर्धेचे आयोजन
नंदुरबार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन श्रीमती एच जी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे करण्यात आले.
या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांमधील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्राविण्य मिळविले. स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ओंकार जाधव, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, योग प्रशिक्षक प्रा सुनील पाटील, शांताराम पाटील, तसेच स्पर्धा संयोजक डॉ मयुर ठाकरे, एस एन पाटील, मनीष सनेर, जगदीश वंजारी, कल्पेश बोरसे, घनश्याम लांबोळे, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या सुषमा शाह म्हणाल्या, “योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर निरोगी व मन प्रसन्न राहते. शालेय जीवनात योगासनाचा समावेश केल्याने विद्यार्थी सुदृढ व एकाग्र बनतात, तसेच खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात.”
या स्पर्धेला पंच म्हणून तेजस्विनी चौधरी, सुनील पाटील, शांताराम पाटील आणि योगेश बेदरकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेतून ३६ खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली असून हे खेळाडू नंदुरबार तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीष सनेर यांनी मानले.



