१० खेळाडूंची विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राजे संभाजी सैनिकी स्कूल मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत जयहिंद विद्यालय, बाभूळगाव आणि केंद्रीय प्राथमिक शाळा, बाभूळगाव येथील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या प्रभावी प्रदर्शनाच्या जोरावर १० खेळाडूंची ८ नोव्हेंबर २०२५ रोजी बीड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना संस्थाध्यक्ष कल्याणराव पाटील, मुख्याध्यापक पंकज बोरणारे, गणेश जाधव, लक्ष्मीकांत लिंभोरे, शैलेश भालेराव, अनिकेत तुपे, रिझवान शेख, अविनाश गायकवाड यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बाभूळगावच्या या कामगिरीमुळे विभागीय स्तरावर पदकांची आशा अधिक बळावली आहे.
जयहिंद विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी
१७ वर्षांखालील मुलींचा गट
- धनश्री गुजराणे – उंच उडी प्रथम, ४०० मीटर हर्डल्स द्वितीय
- अक्षरा वाघ – ३००० मीटर धावणे द्वितीय
- गायत्री जाधव – ३ किमी चालणे प्रथम
- श्रावणी तुपे – ३ किमी चालणे द्वितीय
१९ वर्षांखालील मुलींचा गट
- आकांक्षा नरोडे – ३००० मीटर धावणे प्रथम, क्रॉसकंट्री प्रथम
- शारदा राऊत – १५०० मीटर धावणे प्रथम, क्रॉसकंट्री तृतीय
- अमृता तुपे – १५०० मीटर धावणे द्वितीय, क्रॉसकंट्री सहावी
- दिपाली आगवणे – क्रॉसकंट्री द्वितीय
केंद्रीय प्राथमिक शाळेचे उल्लेखनीय प्रदर्शन
१९ वर्षांखालील मुलींचा गट
- गीता आगवणे – ३००० मीटर धावणे द्वितीय, क्रॉसकंट्री चतुर्थ
- सिद्दी ढगे – क्रॉसकंट्री पाचवी



