भारतीय क्रिकेटचा आयकॉन, चेस मास्टर म्हणून जगभर ओळखला जाणारा विराट कोहली ५ नोव्हेंबर रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या या धडाडीच्या फलंदाजाने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्यानंतर जागतिक क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला. शिस्त, फिटनेस, जिद्द, खेळण्याची शैली आणि प्रचंड सातत्य – यांच्या जोरावर कोहलीने स्वतःला क्रिकेटिंग ब्रँड म्हणून घडवले. टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भरोसेमंद आधारस्तंभ आहे.
कोहलीची सर्वात मोठी ओळख म्हणजे दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याचा अद्भुत परफॉर्मन्स. तग धरून लढण्याची त्याची मानसिकता, दबावाला सामोरे जाण्याची शैली आणि शेवटपर्यंत विजयाची आस यामुळेच त्याला ‘चेस मास्टर’ किंवा ‘किंग कोहली’ म्हणतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर २५,०००+ धावा, शेकडो मॅच- विनिंग इनिंग्ज आणि असंख्य रेकॉर्ड्स – हे सर्व त्याच्या असामान्य सातत्याचे प्रतीक आहेत.
आज कोहलीच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पाच असे अवघड रेकॉर्ड्स ज्यांना भविष्यात एखाद्या खेळाडूने मोडणे सोपे ठरणार नाही – वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी धावपडगिरी करणारा फलंदाज, दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना कोहलीचा सरासरी आणि स्ट्राइक रेट अतुलनीय आहे. फक्त धावा नाहीत, तर विजयी धावा करण्याची त्याची क्षमता अद्वितीय आहे., अत्यंत कमी डावांत शतकांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज, वनडे आणि आंतरराष्ट्रीय शतक यांसंबंधी कोहलीची गती अविश्वसनीय आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याचा मान मिळवणे हा ऐतिहासिक क्षण होता. तसेच तीन फॉर्मेटमध्ये ५०+ सरासरी राखण्याचा विक्रम. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉर्मेटमध्ये एवढे उच्च मानक कायम ठेवणे अत्यंत दुर्मिळ आहे. हे कोहलीच्या पूर्णत्ववादी खेळशैलीचे द्योतक आहे. ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा – मोठ्या स्टेजवर, मोठ्या संघांविरुद्ध आणि निर्णायक सामन्यांत कोहली नेहमीच चमकला आहे. आधुनिक क्रिकेटमधील फिटनेस रिव्हॉल्युशनचा जनक – भारतीय संघाची फिटनेस संस्कृती बदलण्याचे श्रेय कोहलीला मोठ्या प्रमाणात जाते. त्याच्यामुळे योग्य आहार, कठोर ट्रेनिंग आणि शिस्त ही नव्या पिढीची ओळख बनली.
विराट कोहली फक्त एक गुणी फलंदाज नाही, तर प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्याने तरुण खेळाडूंना आत्मविश्वास, आक्रमकता आणि सकारात्मकता कशी अंगीकारायची हे शिकवले. त्याचा प्रवास दाखवतो की खेळात यश मिळवण्यासाठी फक्त प्रतिभा पुरेशी नसते -कठोर परिश्रम, मानसिक शक्ती आणि सातत्याने सुधारणा ही तितकीच आवश्यक असतात.
कोहलीची कारकीर्द अजून संपलेली नाही. वनडे विश्वात त्याच्याकडून अजूनही अनेक मॅच-विनिंग खेळींची अपेक्षा आहे. ‘किंग कोहली’चा पुढचा अध्याय अजूनही लिहिला जात आहे आणि जग त्याचा साक्षीदार आहे !



