अलिबाग (रायगड) : अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत टी एच वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाचा गौरव वाढवला.
या यशाबद्दल स्कूल कमिटी चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य बी बी साळुंखे, उपप्राचार्या थोरात, पर्यवेक्षिका बाबर, पाटील, क्रीडा प्रमुख केशव पवार, डी डी पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यालयाच्या या कामगिरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील स्पर्धांसाठी तयारीला वेग आला आहे.


