प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांचा विद्यार्थ्यांकडून सन्मान

  • By admin
  • November 5, 2025
  • 0
  • 86 Views
Spread the love

मुंबई ः वडाळा येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ घनश्याम ढोकरट यांना “Most Outstanding Leadership and Excellence in Physical Education and Sports Development 2025” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विद्यार्थ्यांकडून विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ ढोकरट यांचा डॉ जितेंद्र लिंबकर आणि संदीप येधे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शारीरिक शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वगुणांची, उत्कृष्ट कार्याची आणि क्रीडा विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल जागतिक स्तरावर घेतल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

या सन्मानामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *