छत्रपती संभाजीनगर : अक्कलकोट, सोलापूर येथे १७ ते १९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या चौथी राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा (सब-ज्युनियर आणि सिनियर – मुले/मुली गट) साठी जिल्हा संघ निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
ही निवड चाचणी मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, सिडको येथे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र पवार व सचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी केले.
अधिक माहितीसाठी अभिजीत साळुंके, डी आर खैरनार, सागर तांबे, हरी गायके, राकेश खैरनार, पांडुरंग कदम, रेखा साळुंके, बाजीराव भुतेकर, रुपाली शेळके शिंदे, अश्वजीत गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीकरिता 9420265151 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



