इंदूर : इंडियन शितोरियो कराटे ऑर्गनायझेशन व उत्तराखंड कराटे संघ यांच्या विद्यमाने तसेच भारतीय कराटे महासंघाच्या सान्निध्यात २२ व २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ऋषिकेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शितोरियो कराटे स्पर्धेसाठी एलेट स्पोर्ट्स अकादमी, इंदूर संघातील ४० खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये तनवीक लश्करी, वंशिका पटले, माही धर्मेंद्र धारू, शौर्य चावडा, साक्षी लोधी, यशराज खोड़े, राधिका पंचोले, सुरभि जैसवार, पंखुडी जैसवार, प्रतीक श्रीवास, आस्था श्रीवास, वरुण राठौर, सिद्धार्थ चौहान, हर्षिता चौहान, श्रेया भाटिया, वंशिका ठाकुर, गार्गी भार्गव, रागिनी पांडे, रोली परोहा, यशिका अडगले, सूरज साहू, पंकज साहू, यशस्वी इंचुरकर, यशिका इंचुरकर, अंशुमन वर्मा, कटियानी चौधरी, गुंजन जाट, गायत्री जाट, स्नेहा राठौर, तेजल विश्वकर्मा, रघुवीर सिंह, दिव्याक्ष द्वार, कुनिका तंवर, डिंपल स्वामी, चेतना सेंगर, साँवि अहिरवार, आराध्या सेन, नितेश मेहता, उपकप्तान रोहित कौशल व कर्णधार देवराज खोड़े यांचा समावेश आहे.
संघाचे कोच फिफ्थ डान ब्लॅक बेल्ट अमय लश्करी, मॅनेजर जसवंत पंचोले, वैद्यकीय सहाय्यक आदित्य चौहान असतील. निवड झालेल्या खेळाडूंना प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मीनू गौर यांनी आभार व्यक्त केले.



