नंदुरबार : नाशिक विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्रीमती एच जी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.
शाळेच्या समर्थ सोनार, सिद्धार्थ परदेशी, जयदीप रणदिवे आणि निकिता बागुल या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळ करीत सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड रमणलाल शाह, सचिव डॉ योगेश देसाई यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, ज्येष्ठ शिक्षक भानुदास शास्त्री, अनघा जोशी, राजेंद्र मराठे, जितेंद्र बारी, भारती माळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या यशात क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर व हेमचंद्र मराठे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असून, राज्य पातळीवरही हे विद्यार्थी जिल्ह्याचा गौरव वाढवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आहे.



