विभागीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत संभाजीनगरचा दबदबा

  • By admin
  • November 6, 2025
  • 0
  • 45 Views
Spread the love

विजय भोसलेसह पाच खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड

छत्रपती संभाजीनगर ः परभणी येथे जिल्हा क्रीडा परिषद परभणी व मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी प्रभावी वर्चस्व राखत ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांसह चमकदार कामगिरी केली. या यशामुळे पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एमजीएम स्पोर्ट्स क्लब व देवगिरी महाविद्यालयाचा खेळाडू विजय राजेश भोसले याने १९ वर्ष वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या संतुलित, वेगवान आणि अचूक खेळाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

१७ वर्ष मुलांच्या गटात श्लोक अंभ्यंकर (एमजीएम स्पोर्ट्स क्लब व सरस्वती भूवन महाविद्यालय) याने सुवर्ण मिळवित आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर त्याच गटात वेद अंभ्यंकर (एमजीएम स्पोर्ट्स क्लब व सरस्वती भुवन महाविद्यालय) याने रौप्यपदक पटकावले. मुलींच्या १७ वर्ष गटात अनुष्का कांबळे (एमजीएम स्पोर्ट्स क्लब व एसबीओए) हिने सुवर्ण पदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. तसेच जानवी राऊत (दुर्गामाता कॉलेज) हिने कांस्य पदक मिळवून संभाजीनगरच्या पदकतालिकेत भर टाकली.

मॉडर्न पेंटॅथलॉन या बहुआयामी खेळाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे गोकुळ तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरात या खेळाकडे खेळाडूंचा वाढता ओढा पाहायला मिळतो. जलतरण, धावणे, शूटिंग, फेन्सिंग आणि घोडेस्वारी अशा विविध कौशल्यांच्या संगम असलेल्या या खेळात स्थानिक खेळाडू स्पर्धात्मक पातळीवर आपली छाप पाडत आहेत.

खेळाडू घडविण्यात निरंजन फडके व राजेश भोसले यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. या यशाबद्दल नितीन घोरपडे, गोकुळ तांदळे, धनंजय फडके, राकेश खैरनार, पूनम राठोड, मनीषा यादव, नितीन राठोड, जॉय थॉमस, अंजूषा मगर आदी मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंकडून राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *