गतविजेते परभणी, नाशिक शहर संघांची विजयी सलामी

  • By admin
  • November 6, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

राज्य कबड्डी स्पर्धा 
 
पुणे ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली राकेश घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या किशोर किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी व आमदार चषक कबड्डी स्पर्धेत परभणी व नाशिक शहर या गतविजेत्या संघाबरोबर गत उपविजेत्या पिंपरी चिंचवड संघानी दोन्ही विभागात विजयी सलामी दिली. 

पिंपरी चिंचवड बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये परभणी संघाने बीड संघाला ४५- ३५ असे पराभूत केले. पूवार्धात एक लोण देत २९-१९ अशी आघाडी घेणाऱ्या परभणीने उत्तरार्धात मात्र अतिशय सावध खेळ केला. परभणीच्या पार्थ गिरी, विठ्ठल डकरे व राहुल चव्हाण यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बीडचे रोहित राठोड, सुरज झगडे यांनी चांगला खेळ केला.

पिंपरी चिंचवड संघाने रायगड संघाला ४३-३६ असे नमविले. पहिल्या डावात दोन व दुसऱ्या डावात दोन लोण देत सामना आपल्या हातुन निसटणार नाही याची पिंपरी चिंचवड संघाने काळजी घेतली. पिंपरी चिंचवडचे सग्राम भालेकर, सुरज डाखोऱे व अमर राठोड यांनी बहारदार खेळ केला. रायगडच्या विग्नेश बनगे व अनुज मगर चांगला प्रतिकार केला.

किशोरी गटात नासिक शहर संघाने ठाणे ग्रामीण संघाला ४९-२० असे सहज नमवित आपण या स्पर्धेचे संभाव्य दावेदार आहोत हे दाखवून दिले.  नाशिक शहर संघाच्या धनश्री शिंदे यांच्या शानदार खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
पिंपरी चिंचवड संघाने ठाणे ग्रामीण संघाचा ५४-२४ असा सहज पाडाव केला. पहिल्या सत्रात एकमेकांचा अंदाज घेत सावध खेळ केला. त्यामुळे गुणफलक १९-१३ असा पिंपरी चिंडवडच्या बाजुने होता. दुसऱ्या सत्रात मात्र पिंपरी चिंचवड तुफानी खेळ करीत तीन लोन देत सामना एक तर्फी केला. पिंपरी चिंचवड कडून रेश्मा वानखेडे, स्नेहा पवार व खुशी भोमे यांच्या आक्रमक खेळामुळे हा विजय सोपा झाला. ठाणे ग्रामीण सोनी धानावे साक्षी भोपळे यांनी बऱ्यापैकी प्रतिकार केला. इतर 

या स्पर्धेचे उद्घाटन विधानसभेचे उपाध्यक्ष व स्पर्धा आयोजक अण्णा बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *