मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने २०२५–२६ हंगामातील अंडर २३ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा केली. येत्या ९ नोव्हेंबरपासून बडोदा येथे ही स्पर्धा होणार आहे.
वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह रवी ठाकर, जितेंद्र ठाकरे, विक्रांत येळिगेटी आणि दीपक जाधव या सदस्यांनी विचारविनिमय करून १६ जणांचा संघ निवडला.
मुंबईचा अंडर २३ क्रिकेट संघ
मनन भट्ट, सुमेर झवेरी, आयुष जठवा, प्रणय कापडिया, जय जैन, आयुष वर्तक, नूतन गोयल, सिद्धित तिवारी, प्रतीक यादव, कुश कारिया, अथर्व भोसले, अथर्व कर्डिले, निखिल गिरी, जाएद पाटणकर, रोहन घाट, प्रिन्स बडियानी.
या निवडीमुळे युवा खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडण्याची आणि वरिष्ठ संघाच्या दारात ठोठावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबईच्या या युवा संघाकडून स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



