सचिव वृषाली जोगदंड यांची माहिती
नांदेड : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली अहिल्यानगर येथे होणाऱ्या २२व्या राज्यस्तरीय सिनियर गट धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघ निवड चाचणी ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
आर्चरी स्कूल, श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम, नांदेड येथे सकाळी ९ वाजता या चाचणीला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन नांदेड आर्चरी असोसिएशनच्या उपाध्यक्ष हरजिंदर सिंह संधू व सचिव आणि प्रशिक्षक वृषाली पाटील जोगदंड यांनी केले आहे.
अहिल्यानगर येथे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत निवड झालेला महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
निवड चाचणीचे वैशिष्ट्ये
निवड चाचणी पुरुष व महिला गटात घेतली जाईल. इंडियन, रिकर्व व कंपाऊंड राऊंड या प्रकारांमध्ये चाचणी होईल. यात इंडियन राऊंड – ५० मीटर व ३० मीटर, रिकर्व राऊंड – डबल ७० मीटर आणि कंपाऊंड राऊंड – डबल ५० मीटर असे असेल. या स्पर्धेसाठी ड्रेस कोड बंधनकारक असून खेळाडूंनी भारतीय आर्चरी असोसिएशनमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
खेळाडूंसाठी महत्त्वाची सूचना
इच्छुक स्पर्धकांनी आवश्यक कागदपत्रे आणि योग्य क्रीडा गणवेशासह ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे. या निवड चाचणीच्या आयोजनासाठी हरजिंदर सिंह संधू, डॉ हंसराज वैद्य, श्रीनिवास भुसेवार, मुन्ना कदम कोंडेकर, सुरेश तमलुरकर, शिवाजी पुजरवाड, मालोजी कांबळे, राष्ट्रपाल नरवाडे, सिद्धेश्वर शेटे आदी मान्यवरांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा संघटनेच्या सचिव वृषाली पाटील जोगदंड (9404662322) यांच्याशी संपर्क साधावा, असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.



