विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत परभणी संघाचे वर्चस्व 

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे; परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडली. यात परभणीच्या संघांनी वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. 

उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार उपस्थित होत्या. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव कैलास माने, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख संतोष कोकीळ, राजासाहेब रेंगे, तांत्रिक समिती प्रमुख महेशकुमार काळदाते, मुख्याध्यापक डी डी दुधाटे, क्रीडा शिक्षक विश्वास पाटील, मनोज टेकाळे, आकाश सरदार, विशाल गिरी, नवले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अरुणा संगेवार म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याचे मौलिक काम क्रीडा शिक्षक करतात. त्यामुळे प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक असणे अत्यावश्यक आहे. आरोग्यदायी जीवनासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मैदानावर जाणे गरजेचे आहे.” त्यांनी नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन केले.

स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर मनपा, बीड, जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, परभणी मनपा व परभणी ग्रामीण या संघांनी १४, १७ आणि १९ वर्षे मुलगे-मुली गटात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक अटीतटीच्या सामन्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

स्पर्धा संचालनासाठी पंच म्हणून महेशकुमार काळदाते, ऋषिकेश काळे, प्रणव यादव, पांडुरंग हजारे, मानव माने, गणेश दराडे, अनिल डवरे, गणेश सौदागर, अजय काळे, नकुल राऊत, विठ्ठल उराडे, पूजा श्रीखंडे, नम्रता अकुलवाड, रोहिणी उफाडे, शितल शिंदे, वैष्णवी सुरवसे व सानिया गायकवाड यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित, योगेश आदमे, सुमित भुसारे, मयुरी जावळे, ओम हरकळ आणि परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचे योगदान मोलाचे ठरले. विजयी संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.

अंतिम निकाल

१४ वर्षे मुलांचा गट ः १) नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, परभणी, २) जिल्हा परिषद प्रशाला उकळी, हिंगोली, ३) पोलीस पब्लिक स्कूल, छत्रपती संभाजीनगर.

१४ वर्षे मुलींचा गट ः १) जिल्हा परिषद प्रशाला उखळी, हिंगोली, २) डी. बी. घुमरे स्कूल, बीड, ३) भारतीय बालविद्या मंदिर, परभणी.

१७ वर्षे मुलांचा गट ः १) वखाड ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, २) जालना, ३) बीड.

१७ वर्षे मुलींचा गट ः १) रावसाहेब जामकर विद्यालय, परभणी, २) ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, छत्रपती संभाजीनगर, ३) जिल्हा परिषद प्रशाला उखळी, हिंगोली.

१९ वर्षे मुलांचा गट ः १) नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, परभणी, २) पोलीस पब्लिक स्कूल, छत्रपती संभाजीनगर, ३) अमृतराव पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पानकनेरगाव (हिंगोली).

१९ वर्षे मुलींचा गट ः १) श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, २) पोलीस पब्लिक स्कूल, छत्रपती संभाजीनगर, ३) बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *