तुळजापूर : येथील श्री कुलस्वामिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल व बेसबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची नोंद करीत विद्यालयाचा गौरव वाढवला. सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटात विद्यालयाच्या मुला–मुलींच्या संघांनी विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले.
सॉफ्टबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवेल. यात पृथ्वीराज माने यांच्या नेतृत्वाखालील संघाने उल्लेखनीय खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुलींच्या गटात शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. पूर्वा दळवी व संस्कृती जाधव यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली संघाने तृतीय स्थान पटकावले.
१७ वर्षे मुलांच्या गटात शाळेच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. ओम जगताप यांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. १९ वर्षे मुलांच्या संघाने तृतीय तर १९ वर्षे मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. क्षितिजा मुकुटराव यांच्या संघाने उत्तम खेळ सादर करत उपविजेतेपदाची कमाई केली.बेसबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या संघाने तृतीय आणि १४ वर्षे मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळले. या सर्व संघांना क्रीडा शिक्षक अनिल धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे, मार्गदर्शक लक्ष्मीकांत पाटील, स्थानिक समिती अध्यक्ष नागनाथ कानडे, मुख्याध्यापक सिद्धेश्वर कबाडे, अनिल धोत्रे, राजू ससाने, धनाजी राऊत, बालाजी गुरव, प्रदीप बिराजदार, दिलीप भालेराव, बालाजी कोने, अशोक सोमवंशी आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.



