सोलापूर ः दत्त चौक गणपती घाट येथील श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या संघाने शालेय शहर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
१४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात त्यांनी गांधीनाथा इंग्लिश मेडियम स्कूलचा १५-११, १८-१६ असा पराभव केला. संघास
क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड पांडुरंग देशमुख, सचिव रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष रेवती कुलकर्णी, खजिनदार सुधीर देव, माजी अध्यक्ष ॲड रघुनाथ दामले, सदस्य प्रशांत बडवे, मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, पर्यवेक्षक मुकुंद गिरी यांनी अभिनंदन केले.



