मुंबई ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक-अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धा ७ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे उत्साहात पार पडली. युआरसी स्तरावरील या स्पर्धेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी बहुविध क्रीडा प्रकारांत प्रभावी कामगिरी सादर करत सुवर्णयश मिळवले.
मुंबई शहर विभागातील व्हॉलीबॉल गटात मनपा शारीरिक शिक्षण विभागाच्या संघाने अप्रतिम समन्वय, सर्व्हिस व बचावामुळे प्रथम क्रमांक पटकावला. तर मुंबई उपनगर विभागातदेखील मनपा शारीरिक शिक्षण विभागाच्या संघाने दमदार खेळ करत विजेतेपदावर आपली छाप उमटवली. या दोन्ही विजयी संघांत महिला व पुरुष खेळाडूंचा समतोल सहभाग लक्षणीय होता.खेळाडूंच्या वैयक्तिक स्पर्धांमध्येही मनपा शिक्षकांचा ठसा उमटला.
युआरसी ०१ (मुंबई शहर) मध्ये गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक प्रकारात मनपा शिक्षकांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. गोळाफेक व भालाफेकमध्ये दुहेरी सुवर्ण, तर थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावत भरघोस यश मिळाले.
युआरसी ०८ (मुंबई उपनगर) मध्ये थाळीफेक व गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक, तसेच गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांकाची कमाई झाली. याशिवाय अॅथलेटिक्स, बॅडमिंटन आणि इतर वैयक्तिक स्पर्धांतही मनपा खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकून चमकदार कामगिरी बजावली.
१०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, बॅडमिंटन या सर्व गटांत पुरुष व महिला खेळाडूंनी पदकांची कमाई करून मनपा शारीरिक शिक्षण विभागाचा मान उंचावला.
या स्पर्धेत दर्शना राऊत, धनश्री सावे, जितीन पाटील, मेघना मिसाळ, महेश कुंभार, जितेंद्र लिंबेकर, श्रद्धा जाधव, माधवी पोकळे, पुष्पांजली, प्रिया पेंडुलकर, अरविंद भांबळे, सोहेल शेख, उबेद शेख, नितीन येलवे, नंदकिशोर सुरकुतवर, मिलिंद जाधव, विनय कांबळे, मारुती गोरड, दिनेश तंबाखे, रश्मी ताय शेट्टे, प्रणिता क्षीरसागर, स्वाती सरमळकर, साक्षी कामतेकर, सुषमा ठाकूर, अलेक्झांडर रॉड्रिक्स, विजय रायसिंग, विजय पाटील, कैलास खोंडे, संजय कांबळे, अजमल, जितेंद्र लिंबेकर आदींनी घवघवीत यश संपादन केले. तसेच निलेश खामगावकर, महेश पिसे, महावीर गुजरे, खान सादिया खातून मोहम्मद रईस, पुणेश आणसाने, दत्तात्रय गावडे, भवन भिसेन, पूनम कोरटकर, पद्मिनी नारकर, मनस्वी वाघमारे, सुमित वाघमारे, योगेश मरकाम, उत्तम मंडपे, हरप्रीत कौर, पुष्पा पवार आदींनी देखील आपापल्या क्रीडा प्रकारात चमकदार यश संपादन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई मनपा शारीरिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक दत्तू लवटे तसेच विभाग निरीक्षक इक्बाल शेख, कनिष्ठ पर्यवेक्षक रघुनाथ सोनवणे, अनिल सनेर, मुख्याध्यापक सचिन पांढरे, मुख्याध्यापक रामचंद्र पिंगळे उपस्थित होते. अधीक्षिका नीलम राणा यांनी खेळाडूस शुभेच्छा देऊन विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण शिक्षक केशव बोरकर, संदेश जुईकर, स्मिता पोतदार, सुवर्णा खुडे, एकनाथ वरकुटे, रमेश बोडके, मिलिंद चंदनशिव, कुंडलिक लाडे, अलेक्झांडर रॉड्रिक्स, स्वाती सरमळकर, सुषमा ठाकूर, मेघना मिसाळ,याचप्रमाणे साक्षी कामतेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जितेंद्र लिंबकर यांनी केले.
मनपा शारीरिक शिक्षण विभागाच्या या यशामुळे शिक्षक-खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी हे यश प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया क्रीडा रसिकांकडून व्यक्त होत आहे.



