मुंबई ः प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी भवन गुहागर, रत्नागिरी येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या चौथ्या फेरीत रत्नागिरीच्या ओम पारकरने ठाण्याच्या कुणाल राऊतवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-१८, १६-१५ व २०-८ असा पराभव करत चौथी फेरी गाठली. रत्नागिरीच्याच योगेश कोंडविलकरने पुण्याच्या आयुष गरुडाला सरळ दोन सेटमध्ये नमवून आगेकूच केली.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल
झैद अहमद फारुकी (ठाणे) विजयी विरुद्ध मंगेश कासारे (मुंबई), राजेश गोहिल (रायगड) विजयी विरुद्ध सुरज कुंभार (मुंबई), पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध विजय पाटील (मुंबई उपनगर), हितेश कदम (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध राहुल भस्मे (रत्नागिरी), समीर अन्सारी (ठाणे) विजयी विरुद्ध सुदेश वाळके (मुंबई उपनगर), रियाझ अकबर अली (रत्नागिरी) विजयी विरुद्ध विलास आंबवले (ठाणे), अमोल सावर्डेकर (मुंबई) विजयी विरुद्ध हेमंत पांचाळ (मुंबई), दिनेश केदार (मुंबई) विजयी विरुद्ध ब्लेसिंग सामी (ठाणे), सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध सुजित जाधव (रत्नागिरी), ओमकार टिळक (मुंबई) विजयी विरुद्ध अब्दुल हमीद (रायगड), रवींद्र हंगे (पुणे) विजयी विरुद्ध आशिष सिंग (मुंबई उपनगर), विश्वजित भावे (ठाणे) विजयी विरुद्ध जोनाथन बोनल (पालघर).



