मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप, आरएमएमएस व सरस्वती हायस्कूल वर्गमित्र मंडळ आयोजित सुवर्णपदक विजेते वर्ल्ड मास्टर पॉवरलिफ्टर दत्तात्रय उतेकर गौरवार्थ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अध्वान ओसवालने ८ वर्षाखालील, आराध्य पुरोने ११ वर्षाखालील तर गोकर्ण औटीने १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकाविले.
अध्वानला निर्णायक साखळी फेरीतील विजयासाठी अनंत महेश्वरीने ३८ व्या चालीपर्यंत झुंजविले. अखेर वजीर व उंटाच्या आक्रमक चाली रचत अध्वान ओसवालने सलग पाचवा साखळी गुण वसूल करीत प्रथम स्थानावर झेप घेतली. याप्रसंगी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा क्रीडापटू दत्तात्रय उतेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई, माजी आमदार सुभाष बने, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला.
परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये ८ वर्षाखालील गटात जीतेज गाडगेने (४ गुण) द्वितीय, अव्यान उपाध्यायने (४ गुण) तृतीय, आर्शिव गोयलने (४ गुण) चौथा, कबीर राईने (३ गुण) पाचवा, अनंत महेश्वरीने (३ गुण) सहावा, दिवीत विजयवेर्गियाने (३ गुण) सातवा, मानव पारकरने (३ गुण) आठवा क्रमांक मिळवला. ११ वर्षाखालील गटात आराध्य पुरोने (५ गुण) प्रथम, अर्णव जगतापने (४ गुण) द्वितीय, स्वरा मोरेने (४ गुण) तृतीय, नैतिक पालकरने (३.५ गुण) चौथा, आद्यंत जम्बुसारियाने (३.५ गुण) पाचवा, कैवल्य परबने (३.५ गुण) सहावा, सिम्रिता बुबनाने (३.५ गुण) सातवा, धैर्य बिजल्वानने (३ गुण) आठवा क्रमांक पटकावला. तर १४ वर्षाखालील गटात गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, मनोमय शिंगटेने (३ गुण) द्वितीय, राज गायकवाडने (२.५ गुण) तृतीय, अद्वय धूतने (२.५ गुण) चौथा, अद्विक शेट्टीने (२.५ गुण) पाचवा, सैश गावकरने (२.५ गुण) सहावा, मानस राणेने (२.५ गुण) सातवा, मैत्रेयी बेराने (२ गुण) आठवा क्रमांक पुरस्कारासह मिळविला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील एकूण १२२ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.



