छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचानालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलीच्या गटात पोलीस पब्लिक स्कूलच्या आद्या भोजने हिने ५३ किलो वजन लिफ्ट करून सुवर्णपदक पटकावले.
मनमाड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. आद्या भोजने हिला डॉ रोहिदास गाडेकर, श्रीराम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संचालक रंजीत दास, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दामोदधरण, किरण चव्हाण, समाधान बेलेवार, सिद्धांत श्रीवास्तव, अभिजीत तुपे, शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.


