राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एमजीएममध्ये ‘विक्रमी सामूहिक सूर्यनमस्कार’ सोहळा

  • By admin
  • November 11, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

एमजीएम विद्यापीठाचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते पोस्टरचे विमोचन

छत्रपती संभाजीनगर ः १२ जानेवारी, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथे विक्रमी सामूहिक सूर्यनमस्कार सोहळा २०२६ आणि सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याच्या पोस्टरचे विमोचन नुकतेच एमजीएम विद्यापीठाचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

हा भव्य सोहळा ४ जानेवारी २०२६ रोजी एमजीएम येथील क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. यामध्ये  दुसरी ते चौथी, पाचवी ते नववी या शालेय वयोगटातील मुले व मुली सहभागी होणार आहेत.

ऐतिहासिक सोहळ्याचा मानस

पोस्टर विमोचन प्रसंगी आर्ट ऑफ लिविंगचे अंकुश दादा भालेकर, उद्योजक मानसिंग बापू पवार, निवृत्त अग्निशमन अधिकारी शिवाजी राव झणझन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर, राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अशोक वडकर, आणि पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्व मान्यवरांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि हा सामूहिक सूर्यनमस्कार सोहळा ऐतिहासिक व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे

या स्पर्धेतील विजयी संघांना राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टकडून आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम विजयी संघाला ५०,०१ रुपये व विजयी चषक तर उपविजयी संघाला ३०,०१ रुपये व उपविजेता चषक देण्यात येईल. तसेच तृतीय विजयी संघास २,००१ व तृतीय विजयी चषक देण्यात येणार आहे. 

सहभागी होण्यासाठी मुदत

या सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, इच्छुक शाळांतील मुले व मुलींच्या संघांनी आपली नावे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सही व शिक्यासह आयोजन समितीकडे जमा करावी लागतील.

या विक्रमी सोहळ्याच्या आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *