कुलदीप सावंत यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत

  • By admin
  • November 11, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

हनुमंत ताटे, संदीप शिंदे यांचा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजतर्फे सत्कार

धाराशिव ः कुलदीप सावंत हे सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. एसटी महामंडळात कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून त्यांना शासकीय सेवेत मार्गदर्शन केले. आज त्यांच्या कार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांचा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय अध्यक्ष मधुकर अनभुले विभागीय सचिव शरद राऊत व कार्याध्यक्ष राजेश काशीद यांची उपस्थिती होती,

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव कुलदीप सावंत, प्राचार्य डॉ आर एम काझी, प्रा बापू बाराते, पवन नाईकल, अभी घुटे, अजय शिराळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सावंत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या यशामागे डॉ महेश राजेनिंबाळकर यांचे विशेष योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बापू बाराते यांनी केले तर आभार प्रदर्शन अभी घुटे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *