जळगाव ः अखिल भारतीय विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यापीठ संघाच्या समन्वयकपदी डॉ. उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या २४ नोव्हेबर ते ५ डिसेंबर भरतपूर, जयपूर राजस्थान येथे अखिल भारतीय खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा होणार आहे. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुस्ती, बॉक्सिंग व अॅथलेटिक्सचे संघ सहभागी होतील. एकूण पाच खेळाडू दोन संघ प्रशिक्षकांचा हा चमू असेल. या सर्व संघांचा समन्वयक म्हणून मुख्य रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचे प्रा. उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी २०२३-२४ यावर्षी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुद्धा विद्यापीठाने समन्वयक व्यवस्थापक म्हणून डॉ उमेश पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यात जळगावच्या खेळाडूंनी प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली होती. यंदाही खेळाडू विद्यापीठाची कामगिरी उंचावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रावेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत नाईक, प्राचार्य डॉ अनिल पाटील, प्रतीक नाईक विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस यु पाटील, प्रा संदीप धापसे सर्व प्राध्यापक वृंद व क्रीडाप्रेमी यांनी निवडीचे स्वागत केले.


