छत्रपती संभाजीनगर : राज्य ज्युनियर मुले हॅण्डबॉल स्पर्धा लोणंद (जि. सातारा) येथे ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाची निवड चाचणी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, एन-७, सिडकोच्या मैदानावर घेतली जाणार आहे.
खेळाडूंची जन्म १ जानेवारी २००६ नंतरचा असणे आवश्यक आहे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, जन्म दाखला किंवा १०वी/१२वीचे बोर्ड प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
निवड चाचणीसाठी अधिकाधिक खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा हॅण्डबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय मोरे व सचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी केले आहे. चाचणीचे नियोजन आशीष कान्हेड, सागर तांबे, डी आर खैरनार, गणपत पवार, अभिजित साळुंके, रेखा साळुंके, बाजीराव भुतेकर व नवनाथ राठोड यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : सागर तांबे – 83810 05503 आणि आशीष कान्हेड – 94231 51161



