मुंबई ः २४वी सबर्बन मुंबई सिनियर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा आणि आठवी कॅडेट जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
साकीनाका येथील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सबर्बन मुंबई जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका लीडा सॅन्टीस, आंतरराष्ट्रीय पुमसे प्रशिक्षक रॉबिन मेंजेस, तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईचे पदाधिकारी संदीप येवले (अध्यक्ष), संदीप चव्हाण (सचिव), कल्पेश गोलांबडे (खजिनदार) आणि संतोष कुंभार (सदस्य), जगदीश अंचन यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या अधिकृत संघटनेचे अध्यक्ष अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेश कररा, सचिव सुभाष पाटील यांच्या मार्गदर्नाखाली ही अधिकृत स्पर्धा आयोजित केली होती.
सदर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू हे आगामी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत शिर्डी येथे सबर्बन मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सुवर्णपदक विजेते
वंश ठाकूर, मृणाली हरणे, आर्यन येवले, दीपेश शिंदे, शुभम दरेकर, अभिजीत देदीनाथ, महिमा थापा, अलिजा शेख, अथर्व सावंत, साहस भोजे, रुद्र रसाळ, आद्या शर्मा.



