छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयातील बारावी इयत्तेत शिकणारी प्रगती देशमुख हिने राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तसेच अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय १० मीटर पिस्तुल स्पर्धेमध्ये पात्र होऊन २० नोव्हेंबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी प्रगती देशमुख हिची निवड झाली.
या कामगिरीबद्दल महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रदीप चव्हाण, प्राचार्य डॉ राजेंद्र पवार, क्रीडा विभागातर्फे अविनाश वाडे व क्रीडा विभाग प्रमुख डॉ रणजित पवार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



