छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि छत्रपती संभाजी नगर आयोजित केलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत एमजीएम क्लोवर डेल शाळेचा विद्यार्थी शेख हाफिज याची १४ वर्षांखालील राज्य शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा अमरावती येथे १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधून हाफिज हा एकमेव खेळाडू आहे ज्याची राज्यस्तरीय निवड झाली आहे. या यशाबद्दल एमजीएम क्लोवर डेल शाळेच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड, उपसंचालक डॉ नम्रता जाजू ,शाळेचे प्राचार्य रितेश मेहता, उपप्राचार्या वर्षा पोतदार यांनी हाफिज याचे अभिनंदन केले आहे. त्याला सागर शेवाळे, प्रिया गायकवाड, निखिल पाठे, रहीम खान यांनी मार्गदर्शन केले आहे.



